हमारे जमाने में.......
आज ९१.९ fm वर पूर्ण 'शोले' सिनेमा लावलाय. अर्थात audio. Tv वरही लागतो म्हणा ब-याचदा. पण सलग एका जागी बसून बघण्या इतके patience नाहीत आता. त्यामुळे तो येता जाता बघितला जातो. त्यामुळे मधले मधले scenes, miss out होतात. पण audio चा फायदा असा की ते पण येता जाता, ( काम करता करता) ऐकता येतं. आज इतक्या वर्षांनंतरही बरेचसे dialogues पाठ आहेत याचं, माझं मलाच आश्चर्य वाटलं आणि अर्थातच प्रचंड आनंद! आणि त्याच्या बरोबरीने तो तो scene डोळ्यासमोर साकार होत गेला. म्हणजे मी दृक्श्राव्य अनुभूती घेत होते. चालू असलेल्या dialogues च्या बरोबरीने किंवा आधीच पुढचा dialogue म्हणणं...यातला आनंद आमच्या पिढीला नक्की कळेल. गंमत म्हणजे लेेेकही तेवढ्याच आवडीने ऐकत होती. आणि 'आईला dialogues पाठ आहेेत' was 'cool' for her.
पण आज प्रकर्षाने काय जाणवलं असेल तर..... dialogues तेच पण बदलत्या ( वाढत्या) वयानुसार, त्याचे अर्थ, संदर्भ, मनात उमटणा-या प्रतिक्रिया, सगळंच बदलतंय. केवळ २०,००० करता गब्बर सारख्या 'खुँख्वार मुजरीम' ला पकडायला तयार होणारे जय वीरू बापूडवाणे वाटले. हल्ली हजार करोडचे गफले तर नागरीकच करून पळून जातात. तरी त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते. Non stop बोलणारी, चुलबुली बसंती जास्तच आवडली. तो naiveness किंवा innocence हल्ली बालपणातून सुध्दा हद्दपार झालाय. Thanks to advance technology. एकुलता एक मुलगा गमावणा-या रहिमचाचाचं दुःख, मनाला जास्तच भिडलं. ठाकूर च्या प्रत्येक family member वर 'दागलेली' गोळी, विशेषतः, छोट्या मास्टर अलंकार वर, हृदयाची धडधड वाढवून गेली. जणू ती प्रत्येक गोळी आपल्याच छातीत घुसल्या सारखी वाटली. खरं तर प्रत्येक जागीच, काही तरी नवीन काही जाणीवा जन्म घेत होत्या.
"इतना सन्नाटा क्यों है ", "मौसी चक्की पिसींग अॅन्ड पिसींग अॅन्ड पिसिंग.....", "कितने आदमी थे ", "ये हाथ मुझे दे दे ठाकूर "......असे सगळेच dialogues मनात कायमची वस्ती करून राहिलेले आहेत. एक एक dialogue अर्थपूर्ण ! विनोद निर्मीती असो, कारूण्य असो की आयुष्याची philosophy ! एकही शब्द illogical, Out of place नाही. हल्ली एवढ्या ताकदीचे, असे अजरामर होणारे dialogues, असतात का हो ...नवीन pics मध्ये ?
निव्वळ अंगवळणी पडलेलं म्हणून हात काम करत होते. कान मात्र, त्या कारटूनस् मध्ये दाखवतात तसे, रेडीओ च्या दिशेने वळलेले असावेत.. ... मी काही 'नवीन' च्या विरोधात नाही.किंवा नवीन सगळंच टाकाऊ असंत असं तर मुळीच नाही. बदलत्या काळानुसार नवीनही खूप चांगलं येतंय, येत राहिल. आता परवाचा 'कारवाँ ' पण तेव्हढाच enjoy केला.तरीही.....तरीही......एक घीसा पीटा dialogue, सारखा मनात घोळत रहातोच....... " हमारे जमाने में....... "
..........निलिमा देशपांडे. १५/०८/२०१८, नवीन पनवेल.

No comments:
Post a Comment