शेजीबाई , लेक तुझी ग दिसे किती गोजिरी
नाजूक जणु बाहुली , लडिवाळ अन साजिरी
आली कोण्या ग देशातून हि सानुली सोनपरी
घातलेस होते कोण्या देवा साकडे, साग तरी
टपोऱ्या डोळ्यात तिच्या ग ,भावविश्व भाबडे
सीमित अवती भवति तुझ्या, विश्वासाने बागडे
मुडपे पहा कशी नाजुक , इवलीशी ती जिवणी
बोले बोल चिमखडे , जणू गोड ती अमृतवाणी
सांडतात कधी हास्याचे दुर्मिळ , माणिक मोती
दिसतात मग, गोड खळ्या , गोबऱ्या गालावरती
लाव ग बाई ,आधी भाळी तिच्या, तीट काजळाची
नकोच लागाया तिला दृष्ट , कुणा दुष्ट नजरेची
वाढो चंद्रकोर हि तुझ्या नभांगणी , कोडकौतुकाने
होवो जीवन तिचे समृध्द ,सुख,स्नेह अन समाधानाने
…………. निलिमा देशपांडे .
No comments:
Post a Comment