चिऊताई इवलीशी, आज वाट चुकली.
शोधित दाणा,खोलीत माझ्या शिरली .
क्षणार्धात चूक , तिची तिला उमगली.
सुटकेसाठी , दिशा दाही भिरभिरली
बळ पंखात असेतो, आकांताने फडफडली
पण अवचित ,जाळीत खिडकीच्या अडकली
डोळ्यात, झाक कारुण्याची होती तरळली
आस ,पिल्लांकडे जाण्याची होती का लागली ?
भूमिका तटस्थाची, होती मी स्वीकारलेली
गरज ,मानवी हस्तक्षेपाची आता मात्र भासली
धरताच हाती , अधिक भयभित ती झाली
पाजताच पाणी, टवटवली,अन भुर्रकन उडाली
आनंदलेल्या मनात, शंकेची पाल चुकचुकली
जाईल का स्वकियांकडून हि स्वीकारली ?
का जाईल मानवी स्पर्शाने कलंकित ठरवली ?
का वाचवून प्राण, मृत्युच्या दारी परत मी ढकलली ?
…………… निलिमा देशपांडे .
No comments:
Post a Comment