नुकताच मुसळधार पाऊस पडुन गेला . आकाश परत निरभ्र झाल . अन तेजोगोलाच , अस्ताला जाण्यापूर्वी , अस विलोभनीय दर्शन घडल . जणू मानवाला , नजरेला नजर भिडवून , त्राटक करता यावं , म्हणून आपल्या प्रभेतील सारी दाहकता आवर्ती घेऊन , अल्प काळासाठी का होईना , तो रोजच असा मवाळ झालेला मला दिसतो . त्याला त्या शीतल चंद्राचा हेवा वाटत असेल का ? आपलाच तेज वापरून , हा आपल्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे , याचा त्याला त्रास होत असेल का? आणि म्हणूनच , हे सौम्य रूप धारण करून , सर्वांना मोहात पाडत असेल का ? असे खूपसे प्रश्न मनात गर्दी करतात . रोज संध्याकाळी !
…………. निलिमा देशपांडे .
…………. निलिमा देशपांडे .
No comments:
Post a Comment