दुसरी बाजू
९:३२ ची लोकल ! आजही धावत पळतच पकडली. हल्ली रोजच अस होतंय. हल्ली म्हणजे, ४ दिवस तर झालेत , maternity leave संपवून, join झाल्याला ! त्या आधी तीन वर्ष तीच लोकल पकडत होते कि ! एकदाही धावपळ करावी लागली नव्हती. घरच सगळ आटोपून, छान तयार होऊन, मी platform वर ९:१५ ला हजार असायचे आणि आता ? निघता निघत नाही पाय घरातुन ! शरीराने तर बाहेर पडते पण मन ? तिथेच रेंगाळत ! छोट्या आदी भोवती ! त्याच रडण, हसण , हातवारे करण , त्याला कुशीत घेतल्यावर … त्याचा तो स्पर्श आणि … आणि त्याला पाजण … सार सार किती सुखावह आहे. या साऱ्या पासुन स्वतःला अलिप्त करताच येत नाही . पण केवळ , एव्हढ्या चांगल्या carrier वर पाणी कस सोडायचं म्हणून मी office join केल ! सुदैवाने सासू सासरे , आई बाबा , चौघेही माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत. " आम्ही सांभाळू आमच्या नातवाला ! तू काही काळजीच करू नकोसं. निर्धास्तपणे तू तुझ्या carrier वर लक्ष केंद्रित कर ! " म्हणण सोपं आहे पण ' आई ' या नव्या निर्माण झालेल्या नात्यात, भावनेत…. मी इतकी गुंतून गेलेय कि मला दुसर काही सुचतच नाहीए . नुसत्या आदीच्या विचाराने पण कुर्ता ओला झाला ! हे तर रोजचच झालय ! बाळाच्या नुसत्या आठवणीने सुध्धा वात्सल्य पाझरत ? निसर्गाची किमया खरच अगाध आहे ! मला awkward झाल . आजूबाजूला पाहिलं मी , कुणाच्या लक्षत तर आल नाही न ?

आणि माझ लक्ष समोरच्या दारात गेल…. आदिच्याच वयाच बाळ …. एक ७_८ वर्षाची मुलगी , त्याला घेऊन दारात बसलेली . गाडीत गळ्यातलं ,कानातलं विकणारे असतात ना , त्यांच्यातलीच होती दोघ ! मला कळवळल . कोणाच का असेना, हे हि बाळ आपल्या आई साठी रडत होत. कुठे असेल त्याची आई ? कुठच्या डब्यात ? त्याच केवीलवाण रडण ऐकवत नव्हत. भूक लागली असेल का त्याला ? पण ती आई तरी काय करेल ? तीच पोट तिच्या हातावर ! तिचाही नाईलाजच नाही का ? मी carrier साठी बाळाला मागे सोडून आले …आणि ती ? पोट भरण्यासाठी ! असे विचार डोक्यात गर्दी करत होते. तेवढयात , जेम तेंम १५ - १६ वर्षांची ,साडी नेसलेली मुलगी , गर्दीतून वाट काढत त्या दोघांजवळ आली. आणि ते बाळ झेपावलं तिच्याकडे ! मी अवाक होऊन पहातच बसले . हे , हिच बाळ ? साडी नेसालीये आणि गळ्यात , जाड काळ्या मण्यांच मंगळसूत्र होत . एवढ्या गोष्टी सोडल्या , तर प्रौढत्वाच्या कोणत्याच खुणा नव्हत्या ,तिच्या चेहेऱ्यावर ,अंगकाठीही अजून पोरसावदाच होती . आणि हि 'आई ' ? माझ्या शेजारी (मला खेटूनच ), एक मध्यम वयीन बाई उभी होती. तिने बहुतेक माझ्या चेहेर्यावरचे भाव ओळखले असावेत . म्हणाली ," आश्चर्य वाटण्यासारख काय आहे ? ह्यांच्या समाजात नितीमत्तेची चाड असेल अस वाटतंय तुला ? हे मातृत्व , तिला स्वेच्छेने मिळालं असेल कशावरून ? " मी चमकलेच ! लादलेल मातृत्व ? हि कल्पना देखिल मला सहन झाली नाही . किती protected वातावरणात वाढले होते मी !जगाच्या या दुसऱ्या बाजूची मला जाणीवच नव्हती का ? पण तस नव्हत ! या आधीही हे विश्व , माझ्या विश्वाचा एक भाग होतच. पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव , एवढ्या प्रखरतेने कधी झाली नव्हती . मला ' लाभलेल्या' मातृत्वाने, एक नवी दृष्टी मला दिली होती .
' लादलेल मातृत्व '! शब्द मनात घोळत राहिले. अंगावर अक्षरशः काटा आला. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर , आमच्या दोघांमधल प्रेम , ते हळुवार क्षण , अंगावर फुललेले रोमांच, सार सार उभं राहिलं ! आणि आमच्या प्रेमाच , माझ्या उदरात रुजलेलं बीज ! माझा आदि ! हे… हे … सगळ किती सुंदर होत ! 'आई होण ' हि अनुभूती किती स्वर्गतुल्य होती . पण ती माझ्यासाठी ! आणि हिच्यासाठी ? किती शारिरीक आणि मानसिक यातना भोगाव्या लागल्या असतील , त्या कोवळ्या जीवाला ? गळ्यात बांधलेल्या त्या मंगळसूत्राला कितपत अर्थ असेल ? काहीही असो ! पण जन्माला आलेलं मुल ! ते तर खरच होत ना !
माझी नजर , पुन्हा त्यांच्याकडे वळली . त्या ' आई ' ने तिच्या बाळाला , त्या मुलीकडून खसकन बखोट धरून ओढल , कडेवर घेतलं . आणि काय आश्चर्य ! ते बाळ रडायचं थांबल. आईचा स्पर्श कळला त्यालाही . माझा आदी नाही का ! एकदा रडायला लागला कि गुलाम अख्ख घर डोक्यावर घेतो. त्याला शांत करता करता आजी आबांची दमछाक होते . आणि मी घेतलं कि मात्र , जादूची कांडी फिरवल्यागत एकदम शांत होतो . गुणी बाळासारखा खुदुखूदू हसायला लागतो . नुसत्या विचाराने मलाच खुद्कन हसायला आलं . रमले मी परत माझ्या गोंडस विश्वात !
अन कर्कश्य रडण्याच्या आवाजाने , पुन्हा भानावर आले . त्या ' लहानग्या आईने ' , आपल्या लहानग्याला परत त्या मुलीच्या हवाली केले होते आणि परत गर्दीत दिसेनाशी झाली होती . ' धंद्यात खोटी ' होऊन चालणार नव्हती ! विकल्या गेलेल्या मालाचे पैसे , बायकांकडून गोळा करायचे होते .
आपल मन किती विचित्र असत नाही का ! लगेच तुलना सुरु झाली . माझ्या बाळाला दिवसभर आई मिळत नसली तरी काळजी घेणारे , प्रेम करणारे आजी आजोबा होते. मुख्य म्हणजे , डोक्यावर हक्काचं छप्पर होत . मायेच्या उबदार घरट्यात ते वाढत होत . तरीही त्याच्यासाठी , माझा जीव तीळतीळ तुटत होता . आणि इथे ? झाशीच्या राणी सारखं , झोळीत आपल मुल बांधून हि आई जीवनाच्या रणांगणावर , आयुष्याशी झुंजत होती .किती हा विरोधाभास !
तेवढ्यात बाळाची आई परत आली .त्याच 'प्रेमान ' तिने बाळाला परत ओढून कडेवर घेतल. बाळ पुन्हा शांत ! मग उलट्या हातानेच तिने त्याच वाहणार नाक , फर्रकन पुसलं . तेवढ्या गर्दीतही जागा करून घेऊन , फतकल मारली , आणि बाळाला पदराखाली घेतलं !
मातृत्व लादलेलं असल तरी वात्सल्य तर नैसर्गिकच होत ना !
आणि हो ! उद्यापासून , मी माझ्या बाळाच्या काळजीच ओझं न वाहता , ९:३२ ची लोकल , वेळेत पकडणार होते .
……………. सौ . निलिमा देशपांडे .
No comments:
Post a Comment