Wednesday, 29 June 2016

समस्या 2

एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

आयुष्यात भिती असते ठेच लागून पडण्याची
सवय करायची आपणचं आपल्या जखमेवर फुंकर घालायची.
हरवलीच वाट तर, मात्र आपणचं आपली नवीन शोधायची
एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

येते वेळ केव्हातरी एक पर्याय निवडायची
चुकलेल्या निर्णयाची जबाबदारी आपणचं आपली घ्यायची
मिळालेली दुसरी संधी, मात्र नाही सोडायची
एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

जगताना मिळत जाते सोबत सग्यासोय-यांची
काही निसटलेल्या हातांची, खंत नाही करायची
धरलेल्या हातांची पकड मात्र, आपणचं घट्ट ठेवायची
एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

कर्तव्य आणि अधिकारांची सांगड नेहमी घालायची
समाजऋण फेडतानाआपली  किंमत आपणच ठरवायची
आत्मविश्वासाची एक ज्योत, मात्र मनात तेवत ठेवायची
एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आपणच शोधायची
आयुष्य ही संपत्ती मात्र कधीच नाही उधळायची
आपल्या प्रत्येक समस्येवर, मात्र आपणच मात करायची
एकच आयुष्य मिळालयं....
सोनं त्याचं करायचंय. ....

No comments:

Post a Comment