सांग उदास असा तू बसलास का रे
पाठीशी तुझ्या आम्ही आहोत सारे
कर मोकळे आता मन आमच्याशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
भासते का तुला चणचण पैशाची?
शोधु चल वाट नवी रोजगाराची
करू मैत्री थोडी जास्त मेहनतीशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
शोधु चल वाट नवी रोजगाराची
करू मैत्री थोडी जास्त मेहनतीशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
वाटते का तुला हे आयुष्य रटाळ?
बंद करु रोजच्या कामांचे गु-हाळ
चल आणू कामात मस्ती थोडीशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
बंद करु रोजच्या कामांचे गु-हाळ
चल आणू कामात मस्ती थोडीशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
आहेत का खुप कटकटी घरगुती ?
दूर करू झाल्या ज्या गैरसमजूती
मोकळेपणाने बोलू चल घरच्यांशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
दूर करू झाल्या ज्या गैरसमजूती
मोकळेपणाने बोलू चल घरच्यांशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
केली का समाजाने तुझी उपेक्षा ?
नकोच ठेऊया कुणाकडून अपेक्षा
चल करू तडजोड थोडी सुखाशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
नकोच ठेऊया कुणाकडून अपेक्षा
चल करू तडजोड थोडी सुखाशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
नको मनात भिती ती एकटेपणाची
मिळेल बघ सोबत मित्रमंडळींची
करू मैत्री सकारात्मक विचारांशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
मिळेल बघ सोबत मित्रमंडळींची
करू मैत्री सकारात्मक विचारांशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
झटकून टाक विचार सारे निराशेचे
शोधु रोज नविन कारण आनंदाचे
करू ओळख या सुंदर आयुष्याशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
शोधु रोज नविन कारण आनंदाचे
करू ओळख या सुंदर आयुष्याशी
सुटतील समस्या बघ चुटकीसरशी
............निलिमा देशपांडे.