"तुझ्या तोंडात साखर पडो"
मध्यंतरी, शं नां च पुस्तक वाचत होते, त्यात हा वाक्प्रचार आला होता. आणि एकदम जाणवलं, किती कमी वेळा वापरतोय हा आपण हल्ली !
अर्थात त्याला 'साखर ' हा शब्द कारणीभूत असू शकतो. अणू बाॅम्ब ला घाबरावं तसं सगळे हल्ली 'साखर' या शब्दाला घाबरतात.
आहारात समाविष्ट करायचं तर सोडाच पण बोलण्यात देखिल गोडवा आला तरी मधुमेह होईल की काय अशी लोकांना भिती वाटत असावी आजकाल.
आणि परवा काय झालं, एक मैत्रीण रस्त्यात भेटली. मला आवर्जून थांबवून म्हणाली, "अग गंमत सांगू का ? मला न काल स्वप्न पडलेलं.... तु तुझ्या नवीन घरात रहायला गेलीयेस आणि घराचा खुप मोठ्ठा हाॅल आहे....अं....पण पुढचं नाही आठवते बाई "
मला इतका आनंद झाला. मी almost नाचत म्हटलं, " नको आठवु दे ग....तुझ्या तोंडात साखर पडो! "
तर चक्क, तिच्या तोंडात मी किडे घातल्याच्या आविर्भावात ओरडलीच माझ्या अंगावर ( आजुबाजुची चार डोकी वळली आमच्या कडे) , "का ग असं ?मी काय तुझं घोडं मारलं? मी तुझ्या साठी एवढं छान स्वप्न पाहिलं तर 'thank you' म्हणणं तर दूरच..... आणि वर मला शाप देत्येस... ! मैत्रीण म्हणवतेस न स्वतःला? मग अशी वैरीणी सारखी का वागलीस?"
मला कळेचना... माझं काय चुकलं? " अग अग.....काय झालं? मी तुझ्या स्वप्नात आले आणि तु माझ्या प्रगतीची इच्छा केलीस.. म्हणून आनंदानेच म्हटलं ..तुझ्या तोंडात साखर....."
" तेच तेच.... एक वेळ विष म्हणाली असतीस तरी चाललं असतं ...पण 'तो' शब्द सुध्दा उच्चारू नकोस. नुसतं तो शब्द कानावर पडल्याने पण वजन वाढेल..... 'तुझ्या सारखं !' सध्या dieting वर आहे न मी. १०० ग्रॅम कमी झालंय..... एका आठवड्यात ! केवळ साखर वर्ज्य केल्याने..... आता बोल "
मी काय बोलणार कप्पाळ !...मला जाडी म्हटल्याचा राग व्यक्त करू की...अग बाई मी तुला thank you च म्हणत होते......हे समजावण्याचा प्रयत्न करू? .....तेच मला कळेना !
आ वासलेलं माझं तोंड मी गपकन् मिटलं. आणि " thank you " म्हणून विषय बदलला. 'तिच्या लेकिचा अन् तिचा dp कित्ती गोड आलाय' असं म्हटलं ....तेव्हा कुठे ती शांत झाली.
मग पुढचा अर्धा तास तिच्या लेकिच्या कौतुकाचं पुराण ऐकून घेतलं. आणि अधून मधून...." हो न ग ", " कित्ती छान ", " मग काय तर.." , वगैरे शब्दांची साखरपेरणी ( पण अर्थात, तििच्या नकळत)करत, गप्पा मारून, दोघी परत आपापल्या दिशांना मार्गस्थ झालो.
मी चालायला लागले खरी....आणि मनातल्या मनात हसायला आलं.
पुन्हा त्या दिवशीचाच विचार मनात घोळायला लागला. ' तुझ्या तोंडात साखर पडो '....किती दुर्मिळ झालंय हे म्हणणं ! असं का बरं ?
मी जस जसा विचार करायला लागले....तश्या काही कारणांच्या शक्यता डोक्यात आल्या.
पहिलं म्हणजे....ब्रिटिश ! हो ब्रिटिशच कारणीभूत आहेत ! कारण त्यांनीच तर आणली न ती आंग्ल भाषा....
जी आता आपल्याला आपल्या मायबोली पेक्षा सहज सोपी आणि सोयीची वाटायला लागलीये.
त्यातले....'sorry' , 'thank you' या दोन शब्दांनी तर मायबोलीतले कितीतरी शब्द आणि भावना , आपल्या बोली भाषेतून हद्दपार केल्या
.... माफी मागणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं...यातलं अवघडलेपण संपवून टाकलं....किती short & sweet झालंय दोन्ही !
आणि पुढचं कारण डोक्यात आलं तेव्हा जरा अस्वस्थच झाले. हल्ली ....दुस-याच्या मनोकामना पूर्ण होवोत ....म्हणून मनापासून शुभेच्छा व्यक्त करणारे कुठे कोणी उरलंय ?
बहुतांशी सगळे... स्व...मध्ये रमलेले असतात. स्वतः पलिकडे दुस-याचा विचार करायला वेळच कोणाला आहे ?
' शुभेच्छुक ' ही जमात नष्ट व्हायच्या पातळीवर आहे.
हां ! आता...शिष्टाचार म्हणून, उपचारादाखल....'wish' ...केलं जातं.आणि म्हणून त्यासाठी...'thank you'...पुरेसं असतं.
पण खरंच ! किती कोरडेपणा आहे त्यात !
....."तुझ्या तोंडात साखर पडो"....यातलं....'तुझही भलं होवो'...या सदिच्छेचं उत्स्फूर्तपण, भावनेचा ओलावा....कुठे व्यक्त होतो ?
आणि आता तर काय, या social media वरच्या emoji नी, अजूनच सगळं सोप्पं करून टाकलंय.
पण असो....कालाय तस्मै नमः !
घरी आल्या आल्या लेक म्हणाली, "आई, उद्या पासून बहुतेक कामवाल्या मावशी यायला लागतील. आत्ता office मधून येताना रस्त्यात दिसल्या. गावाहून आल्या वाटतं."
मी एकदम खुश होऊन म्हटलं," तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई! "
तर म्हणाली, " ए आई, बाई आल्या तर मी कशाला साखर खाऊ ? तुला माहितीये न...मला गोड आवडत नाही ते. "
मी ' explain ' केलं की तिला खरंच साखर खायची नाहिये तर मी तिला 'thank you' म्हणत्ये.
" अगं मग..thank you ...असं सरळ सोप्या मराठीत म्हण की. उगाच difficult words वापरून bore मारू नकोस. आणि तोंडात काही पाडायचंच असेल तर मस्त पैकी पाणीपुरी, शेवपुरी, वडापाव असलं काही तरी चमचमीत घाल नं. साखर काय? पकाऊ नुसती "
आता बोला !
" काय म्हणताय? काळजी नको करू ? सगळं ठीक होईल?
तुमच्या तोंडात साखर पडो बाई!!!!!"
............निलिमा देशपांडे.
२३/०५/२०१८,नवीन पनवेल.

No comments:
Post a Comment