वृत्त : हरिभगिनी
प्रतिबिंबं
डोह स्मृतींचा खोल त्यात प्रतिबिंबे माझी धूसरशी
पुलाखालुनी जाता पाणी बरीच आता परकीशी
नकोच वाटे त्या डोही मज विहार करणे आताशा
चेहरे आणि मुखवटे यांत होते गल्लत अंमळशा
मारे सुळकी घेई उसळी आठवणींची मासोळी
वाट अनवट नि धुके पांढरे उगी मनाला झाकोळी
जीवन गेले वाया सारे जपली केवळ ती प्रतिमा
माझे होते मजपाशी जे जाणली न का मी गरिमा
बदलली आणि या वळणावर सुख दुःखाची परिभाषा
प्रतिमेहूनी ती होती प्रिय मज प्रतिबिंबे आताशा
.......निलिमा देशपांडे.
१६/१०/२०१८, नविन पनवेल.

No comments:
Post a Comment