गुढ, अकल्पित किती दडलेले कृष्णविवारा अंगी,
'गुरुत्वाकर्षण' मुख्य तत्व असे परि जया अंतरंगी.
तारा एक अतिविशाल होई गिळंकृत स्वकेंद्रस्थानी,
ठरे प्रकाश निष्प्रभ, जाई खेचला आप भक्ष्यस्थानी.
करी धारण अणू रेणू वा सहस्त्र सूर्याचे आकारमान,
'उद्रेकात आत्मदहन' ताऱ्याचे, अंतराळात भासमान ,
वसे द्रुष्टी आडच्या सृष्टी, म्हणे जग ' आकाशगंगा',
अगणित प्रकाश वर्ष योजने , कशी मोजावी सांगा.
ना वेळ काळ ना परिमिती च्या उरती तेथ सीमा,
कुंठित मम अल्पमती,आवरु कैसा मनीचा संभ्रमा?
उकलण्या अज्ञाताचे मर्म ठेविसी दूरस्थ केंद्री लक्ष,
मानवा,परि शोधिसी का कधी स्व मनाचे अंतरिक्ष?
………निलिमा देशपांडे.

No comments:
Post a Comment