'हटके' दिवस.....
काही म्हणा...आजचा दिवस जरा 'हटके'च होता. म्हणजे दिवसाची सुरुवात तशी normal routine नेच झाली. ( खरं म्हणजे हल्ली, कोणतीही गोष्ट normal होणं हे सुध्दा 'हटके'च म्हणायला हवं)
मी आणि माझी सख्खी शेजारीण सखी ...दोघींचा shopping spree वर जायचा कट कालंच रचून झालेला होता. आधी मनिष मार्केट आणि मग linking rd असा high funda plan होता.आज फक्त त्याला मुर्तरूप आणण्याचं जिकरीचं काम करायचं होतं.
पण मी म्हटलं न...आजचा दिवस 'हटके'च होता. त्यामुळे संसाराच्या सगळ्या जबाबदा-या पार पाडून IST प्रमाणे अगदी वेळेत, म्हणजे फक्त एक तासाच्या विलंबाने घराबाहेर पडलो.
तिकिटाच्या लाइनीत उभं रहायला न लागता पटकन तिकिटं मिळाली म्हणून झालेला आनंद...एखादा मुंबईकरच....तेही daily commuter नसणारा....समजू शकतो. तर ... आनंदाचे डोही आनंद तरंग....अशा तरल अवस्थेत bridge चढण्याचं दिव्य पार करायला सुरुवात केली आणि फलाटावर लोकल उभी दिसली. हा तर दुग्ध शर्करा योग! फक्त आता आम्ही वेळत पोचायला हवं होतं. मग काय....जीवाच्या आकांतानी धावलो...मी आणि सखी. जणू काही office च मस्टर वाटच पहात होत... नाही तर late Mark पडला असता किंवा मोदींशी appointment घेतली होती जणू.
वाढत ऊन, वय , वजन....असे सगळे अडथळे पार करायचे होते. पण अंगात मुंबईच रक्त सळसळत होतं. त्यामुळे आता माघार नाही...हा दृढनिश्चय ! कालच गाण्याच्या बाईंनी ( ज्या योगा पण शिकवतात ) .....दम लागू नये म्हणून , हाताची एक मुद्रा शिकवलेली. ती लगेच ( वेळेवर आठवली हे सुध्दा नवल विशेषच ) केली आणि अगदी ladies डब्ब्या पर्यंत धावलो. डब्यात पाऊल टाकलं आणि ...महाराजांना गड सर केल्याचा काय आनंद होत असेल...ते अनुभवलं. काही म्हणा आजचा दिवसच 'हटके'च होता. यथासांग बसायलाही जागा मिळाली. आणि दोघींची संसाराच्या गुजगोष्टी करण्यात ब्रम्हानंदी टाळी लागली.
दोन बायका जेव्हा गप्पा मारतात तेव्हा जणू पत्यातला challenge हा डाव खेळत असतात. एकीने काही सांगितलं की समोरचीला....मेरी भी एक उप्पर....या न्यायाने काहीतरी सांगावंच लागतं. आणि खरं सांगायचं तर बायकांच्या गप्पा अश्याच रंगतात. तर सांगायच कारण की आमच्या दोघींच्याही गप्पा सुरू होत्या. अचानक माझी सखी भानावर आली ...."वाशी गेलं का ग?"म्हणून बाहेर डोकावलो....तर 'रबाळे' ! दोघी एकदमच ओरडलो...."ओ ssssनो....रबाळे ??? " Driver ने चुकून चुकीचा route घेतला का आम्ही चुकीच्या train मधे बसलो ? " उतरायचं का पुढच्या station ला " आम्ही पुढची strategy ठरवत होतो. कारण सुजाण नागरिक असूनही, रितसर ticket काढूनही आम्ही दोघी चक्क आता without ticket प्रवास करत होतो. आमच्या सद्सद्विवेक बुद्धीला हे काही पटेना.
शेजारची बाई अनुभवी असावी. सहानभुतीने तिने विचारलं.." का, तुम्हाला कुठे जायचंय ? " परत दोघी एकदमच बोललो, " cst ".
तसं तिने आम्हाला न मागताच friendly सल्ला दिला. " आता मधे अधे उतरू नका. Direct ठाण्याला उतरा. तिकडून cst fast मिळेल".
ठाणा येईपर्यंत धाकधूक. नेमकी tc आली तर? इथे प्रश्न पैशाचा नसतो. आपली पांढरपेशे पणाची अदृश्य वस्त्र कल्पनेतही मळलेली आपल्याला सहन होत नाहीत.
पण मी म्हटलं न...आजचा दिवस 'हटके'च होता. कोणतीही अप्रिय घटना न घडता आम्ही ठाण्याला पोचलो. आणि अर्थातच आम्ही 'सुजाण नागरिक' असल्याने, परत thane ..cst tickets काढली. ( तेवढंच, भारतीय रेल्वे ला आमच्या मुळे additional 'हटके' income झालं) तीही परत रांगेत उभं राहून!
आणि आजचा दिवस 'हटके' असल्याचा शिक्कामोर्तब झाला. Late झालेली cst fast मिळाली. अशा रितीने पृथ्वी परिक्रमा पूर्ण केल्याच्या आविर्भावात आमची जोडगोळी इच्छीत गंतव्याला पोचली आणि तीही विक्रमी वेळेत ! म्हटलं नं ...आजचा दिवस 'हटके'च होता.
मनिष मार्केट ला थोडीफार shopping केली आणि मुख्य म्हणजे भरपूर window shopping झाली. जरी गात्र थकलेली होती तरी डोळे आणि मन दोन्ही तृप्त झालेलं. परततानाही , रांगेत उभं राहून तिकिट काढून, पनवेल लोकल पकडली. ( ' स्वतःच्या पायावर उभं रहायला', ख-या अर्थाने मुंबईकर इथेच शिकतो ) डब्ब्यातही एवढी खचाखच गर्दी असून कुणाचीच 'बा' चा 'बा'ची झाली नाही किंवा कुणाचेच खटके न उडाल्याने दिवसाच्या 'हटके' पणाचा पुनःप्रत्यय आला. मात्र आम्हा दोघींना एकत्र बसायला जागा मिळाल्यावर परत गप्पांमधे इतक्या रंगलो कि पनवेल स्टेशन आलंय, अख्खा डब्बा रिकामा झालाय....हे बराच वेळ लक्षातच आलं नाही. त्याच लोकल मधे बसून, उलट्या पाऊली cst ला जाण्याचे full too chances होते. पण ....मी म्हटलं नं ....आजचा दिवस 'हटके'च होता.
.........निलिमा देशपांडे.
२८/०४/२०१७, नवीन पनवेल.