तुळशी पत्र
आपल्या पारंपारिक, पौराणिक,सांस्कृतिक , सामाजिक, आणि वैयक्तिक आयुष्यात, तुळशी पत्राचे अनन्य साधारण महत्व आहे .पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असायचेच. आता न ती प्रशस्त घर राहिलीत न ते आंगण. पण आजही १ BHK च्या घरातही, छोटीशी का होईना,तुळशीची एक कुंडी, कोना व्यापातेच !
हे तुळशी पत्र वेगवेगळ्या प्रकारे आपल्या उपयोगी पडत. त्याचे औषधी गुण सर्वज्ञात आहेत. घरातल्या आजीच्या हातचा तुळशीचा काढा, खोकणाऱ्या नातवंडानी एकदातरी प्यायलेला असतोच. आजोबांना रोज, पूजा करताना, फुलांबरोबर तुळशी पत्र वाहताना वेगळच समाधान मिळत. ग्रहणात जे अशुध्द वातावरण तयार होत, त्याचे शुध्धीकरण करण्याची प्रचंड ताकद या तुळशी पत्रांत असते , असा समज जुन्या पिढीत आहे. आणि विज्ञानानेहि या विधानाला पुष्टी दिलेली आहे. तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्राणवायु उच्छ्वासतात. म्हणूनच आजूबाजूचा परिसर शुध्द राहतो. ह्या तुळशीपत्रा पासुन नुसतें डासच नाहीत तर चक्क, मृत्युवर अधिपत्य गाजवणारा यमराज देखील चार हात लांब रहातो. म्हणूनच घरच्यांच्या आरोग्याच आणि जीवनाच रक्षण होत.
तसच, उपसानेचा एक अविभाज्य घटक आहे , हे तुळशीपत्र ! उदक आणि तुळशीपत्र सोडून केलेलं कोणतही दान , हे सत्पात्रीच होत, अशी ठाम समजूत आहे.
मात्र व्यवहारी जगात , या तुळशी पत्राला काही वेगळे संदर्भहि आहेत. ' एखाद्या गोष्टीवर तुळशीपत्र ठेवणे ' म्हणजे त्या गोष्टीचा कायमचा त्याग करण किंवा त्या गोष्टीच अस्तित्व , या पुढे संपुष्टात आल्याच ग्राह्य धरणं ! इहलोकीची यात्रा संपवलेला 'देह' जेव्हा ' कलेवर ' म्हणून उरeतो , तेव्हा त्यच्या तोंडात तुळशीपत्र ठेवल तर त्या आत्म्याला मोक्ष मिळतो , अशी धारणा आहे. शिवाय ' हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे ',म्हणजे एकाची वस्तु , तिसऱ्याला परस्पर देऊन , मधल्या मधे आपण त्या दानाचे श्रेय लाटून , पुण्य कमावू पहाणारी माणस तर या स्वार्थी जगात, पावलोपावली भेटतात.
एरवी सोयीस्करपणे ' पुराणातली वांगी पुराणात ' ठेवतो आपण! पण या पुराणातच तुळशीपत्राच्या महात्म्याचे कितीतरी दाखले आहेत ! मात्र हे तुळशी पत्र केवळ विष्णू आणि त्याचे वेगवेगळे अवतार , यांनाच वाहिले जाते. प्रेमाचं आराध्य दैवत मानला जाणारा श्रीकृष्ण, ह्याला तर ते प्राणप्रिय आहे. कृष्णाला वाहिलेलं कोणतही अर्ध्य, तुळशी पत्राचा समावेश केल्याशिवाय पूर्णत्व पावत नाही. कृष्णाशी होणारा तुलसी विवाह, हा आपल्या सगळ्यात आवडत्या सणाचा, दीपावलीचा, समारोपाचा दिवस असतो.
सत्यभामेने जेव्हा, कृष्णाची 'सुवर्ण तुला' करून , आपल त्याच्यावरच प्रेम सिद्ध करायचा प्रयत्न केला तेव्हा संपूर्ण राज्यातलं सुवर्ण , 'तुला' करायला कमी पडलं . मात्र तेव्हा रुक्मिणीने श्रद्धेने अन् प्रेमाने ठेवलेल्या केवळ एका तुळशी पत्राने ती 'तुला' पूर्ण झाली. आणि रुक्मिणीच्या प्रेमाच पारड किती जड आहे, हे सिध्द झाल.
कृष्णाने , आपली बहिण द्रौपदी, वनवासात असताना , तिच्याकडे अन्नाची याचना केली. द्रौपदीने सर्व अन्न संपल्याचे सांगितले. तेव्हा थाळीला चिकटलेले एक तुळशीपत्र कृष्णाला दिसले. त्याने आनंदाने त्याचे सेवन केले. अन अहो आश्चर्य ! कृष्णाने तृप्तीची ढेकर दिली! एवढच नव्हे तर पांडवांची फजिती करायला आलेल्या दुर्वास ऋषी अन त्यांच्या भक्त गणांचीही पोटे भरली.
म्हणजेच काय तर हे तुळशी पत्र प्रत्येक गोष्टीला पूर्णत्व देत. त्याच्या सेवनाने किंवा त्याच्या नुसत्या सानिध्याने देखिल समाधान , तृप्ती , परिपुर्णता, याची अनुभूती येते.

मग हीच अनुभूती, माणसाला का बर येत नाही ? त्याला मात्र कितीही सुख मिळालं तरी ' ये दिल मांगे more ' ! कुठे थांबायचं , ते त्याला कधीच का कळत नाही ?
मग माझ्या मनात विचार येतो कि आपल्याला नाही का अस एखाद तुळशी पत्र मिळणार? कि ज्याच सेवन केल्याने, आपल्या आयुष्याला परिपूर्णता येईल ? आपण समाधानाची आणि तृप्तीची ढेकर देऊ शकू ?
तुम्हाला कुणाला गवसलंय का हो, असं 'तुळशी पत्र '?
.............निलिमा देशपांडे.

No comments:
Post a Comment