Thursday, 28 April 2016

राह


पता था हमें......
हम आपकीं मंजिल तो कभी थे हीं नहीं।
फिर बिछा दिया खुद को.....
आपके पैरोंतले।
बन गये आपकी राह।
सोचा......
मंजिल तक साथ तो रहेगी।
फिर सजा लिया खुद को......
अरमानों की कलियों से,
जज्बातों के फुलों से।
ताकि......
आसान हो आपका सफर।
पर नादान थे हम।
समझ न पाएँ......
राहगिर की नजर मंजिल पर होती हैं.....
राह पर नहीं।
फिर न जाने क्या हुआ! 
कुछ देर हमे रोंध कर....
चल दिये आप किसी नए मोड़ पर।
शायद हमसे भी ज्यादा आसान राह थीं ?
या आपको चुनौतीयाँ ही पसंद थीं?
अब सोचते हैं......
काश....
रख देते......
थोडे मुश्किलों के कंकर ,
या चुनौतीयों के पत्थर,
दुःखों के काटे,
असफलता के गढ्डे,
तो हो जाते परेशान.....
लग जाती कहीं ठेस......
कभी चुभन महसूस करते......
या तो गिर जाते कभी कभार......
तो कोसने के लिए हीं सही.......
नजरें झुकाकर......
एक बार तो हमारी तरफ देखते.......
एक बार तो हमारी तरफ देखते.......
..............निलिमा देशपांडे।

Thursday, 14 April 2016

Into The Wild

Into The Wild......

Every now and then, I realise,there dwells a 'gypsy' in my mind,
& I know, this phenomenon is just  one of it's kind.

One fine day,he wants to be rebellious,
& shedding all his docility,he   becomes ferocious.

He wants to defy all the shackles of civilization,
& to go on, on a lone nomadic expedition.

To sour and touch, the limitless skies, to dive into deep oceans.
Wants to live and pursue, for once, his life's true passion.

To see, to explore, to experience nature's bounties,
That exist within and beyond all the boundaries.

For once,  to convince  'the self', that " I do dare ",
Without the slightest hesitation or a single prayer.

Wants to meet up with that much dodging happiness, in it's solitude,
Would like to show it and the world, what it's like 'to have an attitude'

Beyond the cozy comforts and into the wild,
Enough of everything about life, being ' just mild'

Just then he realizes. ......

"When I am gone, no one would care,
On my grave, there would never be, a single tear.

That everything is  worthless, with no one to share",
Even 'a gypsy' has, deep within, a 'molten core'.

Once again meekly, he comouflages within me and adorns 'the shackles',
And I keep wondering , how easily, every situation, he tackles.
...........Nilima Deshpande.p

Thursday, 7 April 2016

प्रिय पावसास

प्रिय पावसास,
कसा आहेस ? ......फार काही नाही रे , विचारायच होतं .....येणार आहेस न या वर्षी ? ते ही ' वेळेत ' ? खंर तर ना हल्ली,  आमच्यातला...... म्हणजे माणसा माणसातलाच .......'संवाद'  संपलाय.........अधुनिक तंत्रज्ञानाची देन. ...समोरासमोर 'बोलण्या'  पेक्षा........., ' लिहून ' व्यक्त होणं....... जास्त सोयीस्कर वाटायला लागलय!.........त्यातून बरंच काही साध्य होतं ........आणि बरंच काही टाळताही येतं.........पण सद्य परिस्थिती पहाता, कोणीतरी तुझ्याशी संवाद साधणं गरजेचं वाटलं .......म्हणून हा पत्र प्रपंच! ....
आवडतच आम्हाला तुझं येण......केव्हाही. ....कधीही. .....
तु येण्यापूर्वीची ती अस्वस्थता, हुरहूर.......कधी मनात आणि बाहेर उठणारी वावटळ .....आणि तु येऊन गेल्यावर.....मनात आणि आसमंतात भरणारं  नवचैतन्य.....भरून राहिलेला मृदगंध......निसर्गाच्याही तना  मनावर रेंगाळणारी आर्द्रता....ग्रीष्माच्या झळांनी ग्रासलेल्या चराचराला तृप्त करतोस ..... धरेच्या उदरात दडून बसलेलं, नवजीवनाला आसुसलेलं बीज....... झिरपलेलं पाणी अधाशासारख पिऊन. .... तरारून उठतं....... जगण्याच्या नव्या उमेदीने सजीवांच्या जगात प्रवेश करतं....... हिरव्या कंच, इवल्या कोंबाच्या रूपात!.......वसुंधराही तेवढ्याच अभिमानाने ही आपली बाळं अंगाखांद्यावर बाळगते........वात्सल्याने त्यांच संगोपन करते.....त्या वात्सल्याचा ओलावा, तूच तर असतोस......अवनीचं अंतर्बाह्य रूप, क्षणार्धात पालटवून टाकायची किमया तुचं करू जाणे.....आधी तुझ्यासाठी तरसणं .........मग तुझं बरसणं.......कधी नुसतेच तुषार.........चुटपुटतं येणं.......कधी  पैसा खोटा झाल्यासारखं कोसळतच राहातोस.....सगळंच अनिश्चित...... वेळेत न येता, अवेळी मात्र येतोस. ...बळीराजाच्या आयुष्याला अवकळा  आणतोस......मग तुला आरोपीच्या पिंजर्यात उभं करते... .... ती  मानवजात.......त्या संतापाचा उद्रेक म्हणजेच का रे ती ढगफुटी ?........तुझ्या संहारक शक्तीच प्रदर्शन? .... सुड उगवल्याच समाधान......ते तरी मिळतं का रे तुला ?......का ' शक्ती प्रदर्शनाचा' मोह तुलाही आवरत नाही? ....... त्या कृतघ्न मानव जातीचा मीही एक अविभाज्य घटक आहे......हे सत्य मी नाकारू शकत नाही.....पण अरे , आमची पुढची पिढी खूप हुशार आणि जागरूक आहे.......ती नक्कीच पृथ्वीच्या अविरत चाललेल्या अध:पतनावर प्रतिबंधक उपाय शोधुन काढेल.......मग तर जाईल ना तुझा राग? ......भले तुझा लहरीपणा सोडू नकोस. .....पण येत रहा....ही विनंती
...................तुझी अभिलाषि
                     एक मानवी चातक.
.................निलिमा देशपांडे.